१७४+
वर्षांचा वारसा
वर्षांचा वारसा
ज्ञानाची उपासना हा समाजाच्या संस्कृतीचा मानदंड असतो. ज्ञानाला स्थल कालाच्या मर्यादा नसतात, तसेच त्याच्या उपासनेलादेखील जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांची संकुचित बंधने अडवू शकत नाहीत. हेच ब्रीद मनाशी ठेवून गेली १७४ वर्षे करवीर नगर वाचन मंदिर वाटचाल करीत आहे.
ग्रंथाच्या रूपाने केवळ ज्ञानसंचयच नव्हे, तर विविध उपक्रमांद्वारे ज्ञानोपासनेसोबत ज्ञानप्रसार करून एक सांस्कृतिक व्यासपीठ अशी आपली प्रतिमा संस्थेने समाजमनात निर्माण केली आहे. करवीरकरांच्या मनात या संस्थेबद्दल उत्स्फूर्त प्रेमासोबत अभिमानाची आणि आदारची भावना आहे.
१५ जुन १८५० रोजी कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी या नावाने लावलेल्या रोपट्याचा आता महावृक्ष झाला आहे. एकशे साठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासातील अनेक उलथापालथीतून ही संस्था समर्थपणे आणि भक्कम पायावर उभी राहिली, ती करवीरवासीयांच्या प्रेमामुळे.
वर्षांचा अनुभव
पुस्तकांचा संग्रह
ग्रंथालय सभासद
क्षेत्रफळ चौ. फूट.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित जिल्हा ‘अ’ वर्ग सार्वजनिक वाचनालय.
सन् १९०० सालापूर्वी प्रकाशित शंभराहून अधिक मराठी नाटकांचे जतन.
वेबसाईटवर दहा हजारहून अधिक दुर्मिळ व संदर्भ ग्रंथांची सूची देण्यात आली आहे .
ग्रंथालयाचे सन १८६७ पासूनचे मराठी / इंग्रजी व मोडीतील अहवाल व दस्तऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण.